राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकाविले पुरुष विजेतेपद तर महिला संघाने उपविजेतेपद..
राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकाविले पुरुष विजेतेपद तर महिला संघाने उपविजेतेपद..
पनवेल वैभव, दि.२९ (संजय कदम) ः राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा नुकतीच कर्नाटक (मँगलोर) येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दुहेरी विजेते पद पटकाविले आहे. त्यामध्ये पुरुष संघाने विजेतेपद तर महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले आहे. यामध्ये पनवेलमधील दोन तरुण सुद्धा सहभागी झाले होते व ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
सदर स्पर्धेकरिता देशभरातून पुरुषांचे 32 संघ तर महिलांचे 29 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सहभाग घेवून पुरुष गटाचे विजेतेपद पटकाविले तर महिला गटाने उपविजेतेपद पटकाविले आहे. या महाराष्ट्र संघात रायगडमधील 6 मुले व 5 मुलींचा समावेश होता. त्यामध्ये वरद शिंपी, विक्रम जयस्वाल, आर्यन पाटील, सर्वेश पाटील, मितांशु करपे, करमनसिंग हुंडल ही रायगडमधील सहा मुले तर तिथी प्रामाणिक, श्रावणी दिवेकर, आरती पाटील, लास्या राव व साईवी भोसले या पाच मुलींचा सहभाग होता. यातील साईवी भोसले हिला स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. या त्यांच्या यशाबद्दल रायगडसह पनवेलकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो ः राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजयी
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image