नवजात मधुमेहाचे निदान झालेल्या आणि अकाली जन्मलेल्या बाळाच्या २५ दिवसांच्या संघर्षाला यश
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या व्यवस्थापन

नवी मुंबई (पनवेल वैभव ): खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या टिमने, नवजात शिशु तज्ज्ञ आणि एनआयसीयू विभागाचे डॉ. तन्मेष कुमार साहू आणि सल्लागार बालरोग एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. रचना केशवानी यांच्या नेतृत्वाखाली, अवघ्या ३० आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या व नवजात मधुमेहाने ग्रासलेल्या बाळावर योग्य उपचार करण्यात आले.

नवी मुंबई येथील सौ शमिता (नाव बदलले आहे) आणि श्री राज सिन्हा (नाव बदलले आहे) हे जोडपे, त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत होते. गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या गर्भवती मातेला गर्भावस्थेच्या अवघ्या ३० आठवड्यांतच सॅकमधून अम्नीओटिक द्रवपदार्थ बाहेर आल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सी-सेक्शन करावे लागले. यानंतर तिने १.१ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला व या बाळाला श्वसनाचा त्रास होत होता. जन्माला आल्यानंतर त्या बाळाला तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली तात्काळ नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दाखल करण्यात आले.

 नवजात शिशु तज्ज्ञ आणि एनआयसीयू प्रभारी डॉ. तन्मेष कुमार साहू सांगतात की, एनआयसीयू नियमावलीनुलार, बाळाला योग्य श्वसन क्षमता आणि पोषणाकरिता तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. ३० आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या या बाळाचे फुफ्फुसे अपरिपक्व असल्याने तसेच श्वसन सिंड्रोम (रेस्पीरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) होता ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता.तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली बाळाच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्यात आली. त्यानंतर बाळाला स्तनपान सुरू करण्यात आले. नियमित देखरेखीमुळे मधुमेही मातांच्या बाळांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या हायपोग्लाइसेमियाच्या उलट, सुमारे ३०० मिलीग्राम/डीएलची उच्च रक्तातील साखरेची पातळी दिसून आली. दुर्दैवाने, बाळामध्ये साखरेची पातळी ही अनियंत्रित आढळून आली.

डॉ. तन्मेष साहू पुढे सांगतात की, आम्हाला नवजात बाळामधील मधुमेहाचा संशय आला, जो कदाचित जनुकीय दोषामुळे उद्भवू शकतो. सुरुवातीच्या काळात होणारा मधुमेह हा बहुतेकदा नवजात मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे उद्भवतो. या स्थितीबद्दल बाळाच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले आणि अनुवांशिक चाचणी करण्यात आले. निदानाकरिता रक्ताचे नमुने यूकेमधील एक्सेटर मेडिकल स्कूलमध्ये पाठवण्यात आले. दरम्यान, बाळाला हळूहळू ७ व्या दिवसापर्यंत स्तनपान देण्यास सुरुवात करण्यात आली, परंतु त्यानंतरही रक्तातील साखरेची पातळी सुमारे ४०० मिलीग्राम/डीएल पर्यंत वाढली. बाळाच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी NPH इन्सुलिन अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले.

नवजात बाळामधील मधुमेहाचे निदान आश्चर्यकारक व गुंतागुंतीचे होते. संपुर्ण टीमने नवजात बाळाची प्रकृती स्थिर रहावी याकरिता यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. बाळाला तोंडावाटे मधुमेहविरोधी औषध ग्लिबेनक्लामाइडने उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिरावल्यावर २५ दिवसांनी बाळाला घरी सोडण्यात आले आणि तो त्याच्या वयानुसार विकासाचा टप्पा गाठत आहे. एनआयसीयू टीमने अकाली  जन्मलेल्या या बाळाच्या साखरेची पातळी नियंत्रित केली त्याचबरोबर बाळाच्या पालकांना घरच्या घरी इन्सुलिनच्या पातळीचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण दिले अशी माहिती डॉ. तन्मेष साहू यांनी दिली. 
नवजात बाळामधील मधुमेह हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे आणि अकाली बाळामध्ये त्याचे निदान करण्यासाठी अचूकता आणि कौशल्य गरजेचे आहे आहे. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील आमच्या टीमने या दुर्मिळ आजाराचे नियंत्रण करत प्रभावीपणे उपचार आले. बाळाच्या पालकांनाही याबाबत योग्य प्रशिक्षण दिले अशी माहिती बालरोग एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. रचना केशवानी यांनी स्पष्ट केले. 
ही आमची पहिली गर्भधारणा होती आणि त्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने आम्ही खूप निराश झालो होतो. आमच्या बाळाचे प्राण वाचवल्याबद्दल आम्ही डॉ. तन्मेष, डॉ. रचना आणि संपूर्ण एनआयसीयू टीमचे आभार मानतो. सुरुवातीच्या गंभीर टप्प्यापासून ते घरी सोडल्यानंतर बाळाची देखभाल करेपर्यंत वेळोवेळी त्यांनी  मार्गदर्शन केले अशी प्रतिक्रिया बाळाची आई शमिता सिन्हा (नाव बदलले आहे)* यांनी व्यक्त केली.
Comments