पोलीस खात्यातील गुणवत्त सेवेबद्दल पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अंकुशराव गायकवाड होणार सन्मानित...

          
पोलीस खात्यातील गुणवत्त सेवेबद्दल पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अंकुशराव गायकवाड होणार सन्मानित...

पनवेल / प्रतिनिधी :-
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अंकुशराव गायकवाड सध्या चेंबूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्यांना त्यांच्या पोलीस खात्यातील गुणवत्त सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. पोलीस सेवेमध्ये केलेली चांगली कामे, विविध दाखल गुन्ह्यांची उकल, वार्षिक शेरे, कामाची गुणवत्ता, अशा विविध निकषांवर आधारित त्यांना हे पदक देण्यात आले आहे. 
           अलिबाग पोलीस स्टेशनला असताना त्यांनी स्वित्झर्लंडच्या फिलिप्स रूसी याचा चोरीला गेलेला कॅमेरा, फक्त दोन तासात हस्तगत केल्याने ही बातमी  स्विझर्लंड मधील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे भारतातील पोलिसांचे कामाची चर्चा सर्वत्र होती. १९९६ साली अलिबाग मध्ये घरफोडी चोरांची टोळी पकडून, ६ ते ७ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली होती. अलिबाग मधून आरोपीने चोरी केलेल्या टेप रेकॉर्ड वर तो डान्स करत होता. आरोपी नाचण्यात दंग असताना पोलिसांनी त्याचा भंग केला होता. अलिबाग किल्ल्यातील देवीचे दागिन्यांची चोरी झाली होती.आरोपीला मुरुड मधील तुरवाडी येथून ताब्यात घेऊन दागिने हस्तगत केले होते. पोलीस मॅन्युअल इंग्लिश मधून मराठीत करणे कामी त्यांनी योगदान दिले होते. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना गुणवंत सेवेबद्दल पोलिस पदक देण्यात येणार आहे.
          पनवेलमध्ये देखील त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात चांगले काम करून आपला ठसा उमटवला होता.१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे दिवशी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image