ओरायन मॉलचा ९ वा वर्धापनदिन थाटामाटात सिनेतारकांच्या उपस्थितीत संपन्न....
ओरायन मॉलमध्ये मराठी चित्रपटांना प्रथम प्राधान्य देण्यात येते हे कौतुकास्पद - अभिनेते समीर चौघुले
पनवेल वैभव, दि.26 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील एकमेव मॉल म्हणुन प्रसिद्ध असलेल्या ओरायन मॉलचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात थाटामाटात सिनतारकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आगामी काळात प्रदर्शित होणार्‍या गुलकंद या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक सचिन मोटे, चित्रपटातील कलाकार समीर चौघुले, ईशा डे आदींच्या मान्यवरांच्या उपस्थितीत बहारदार व खुसखुशीत अशा मुलाखतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
या वर्धापन दिनी नऊ विजेत्यांना ओरायन मॉलच्या माध्यमातुन विशेष आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. याकरिता मॉल प्रशासनाने आयोजित केलेल्या शॉप अँड विन कॉन्टेस्टच्या विजेत्यांची निवड उपस्थित मराठी चित्रपटातील सेलेब्रिटींनी केली. या मराठी सेलेब्रिटी मध्ये स्मिता शेवाळे, नेहा नाईक, समीर चौघुले, इशा डे, तेजस बर्वे यांच्यासह गुलकंद या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक सचिन मोटे यांची उपस्थिती महत्वाची ठरली. यावेळी त्यांनी पनवेलकरांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना अभिनेते समीर चौघुले यांनी सांगितले की, ओरायन मॉल हे नेहमीच नव्याने प्रदर्शित होणार्‍या मराठी चित्रपटांना पाचही ठिकाणी प्राधान्य देतात. हे कौतुकास्पद आहे. मराठी माणूस असा एकमेकाच्या पाठी उभा राहिल्यास मराठीचा झेंडा अटकेपार लागल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गुलकंद चित्रपटासंदर्भात संवाद साधला. तसेच चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य सुद्धा केले. 
या कार्यक्रमाला ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिपक करेलिया, मनन परुळेकर आदी उपस्थित होते. दरम्यान नऊ विजेत्यांपैकी प्रथम विजेत्याला यमाहा फसिनो स्कुटर आणि द्वितीय विजेत्यांना आय पॅड व इतर विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले. याप्रसंगी मराठी चित्रपट मुक्ताई हा नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे या चित्रपटात भूमिका करणार्‍या स्मिता शेवाळे यांनी सांगितले. तसेच आध्यात्मिक ओढा आता लोकांचा वाढत चालला असून पंढरपूरच्या वारीला जशी दरवर्षी गर्दी वाढत जाते तशाच प्रकारे आता मराठी चित्रपटांना सुद्धा चांगला प्रतिसाद मराठी बांधवांकडून मिळकत असल्याचे त्यांनी सांगितले. आवर्जून या सुट्टीच्या काळामध्ये हा चित्रपट आपल्या मुलांना दाखवावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
फोटो ः ओरायन मॉल नववा वर्धापनदिन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image