पनवेल तालुका काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी दिनकर देसाई..
जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

उलवे, ता. 17 :  पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अंतर्गत पर्यावरण विभागाच्या  उपाध्यक्षपदी कालीवली-चावणे येथील दिनकर झिपरू देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी गुरुवारी शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगला येथे प्रदान केले.ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी आणि पर्यावरण विभागाच्या विकासासाठी देसाई यांनी भरीव काम करावे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी  काँग्रेस कार्यकर्ते सिताराम माळी, पर्यावरण विभागाचे राजीव पाटील उपस्थित होते. दिनकर देसाई यांच्या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
Comments
Popular posts
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तिघांना मिळाले तात्काळ उपचार...
Image
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश...
Image
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोमल मोहनिष भोईर यांना ''टॉप 30 इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2026'' प्रदान...
Image
पनवेलच्या सिद्धांत संजय कांबळे विद्यार्थ्याचे स्कॉटलंड सॉलिसिटर परीक्षेत घवघवीत यश...
Image
धरणे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेवून नागरिकांनी आवश्यक ती खरबदारी घ्यावी - वपोनि गजानन घाडगे..
Image