नवं वर्ष स्वागत समिती आयोजित भव्य दिव्य शोभा यात्रेच्या स्वागतासाठी आ.विक्रांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य महाकुंभ नगरी साकार...
शोभायात्रेत नागरिकांना पौराणिक संस्कृतीचा अनोखा अनुभव
पनवेल /(प्रतिनिधी) दि.३०,
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन वारसा जपण्यासाठी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेलमध्ये शोभा यात्रेच्या स्वागत प्रसंगी साकारलेली महाकुंभ नगरी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाने नागरिकांना हिंदू नववर्षाचा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव मिळत होता.समस्त हिंदू नूतन वर्ष शोभा यात्रा समिती, सर्व पनवेलकर नागरिक यांचे आमदार विक्रांतदादा पाटील आणि सहकाऱ्यांनी अतिशय जल्लोषात महाकुंभ नगरीत हार्दिक स्वागत केले.
महाकुंभ नगरीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कुंभमेळ्यातील भव्य दिव्य श्री महादेवाची प्रतिकृती, साधू-संतांच्या प्रतिकृती आणि बांधवावर झालेली JCB च्या साह्याने फुलांची भव्य उधळण.आमदार. विक्रांत दादा पाटील यांच्या अनोख्या संकल्पनेने उपस्थितांना अध्यात्म आणि संस्कृतीचा अनुपम संगम अनुभवायला मिळाला. 
आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सांगितले की, “हिंदू धर्माचा इतिहास आणि कुंभमेळ्याची परंपरा ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या महाकुंभ नगरीच्या माध्यमातून आपल्या मुळ संस्कृतीचा अभिमान रुजवण्यासाठी,आणि नव्या पिढीला आपल्या गौरवशाली वारश्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत, तसेच प्रयागराज कुंभ मेळा भक्तिभावात यशस्वी झाला असून आता तयारी आगामी काळात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची हा देखील संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
गुढीपाडवा हा सण नववर्षाची सुरुवात तर करतोच, शिवाय विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या सणाच्या निमित्ताने महाकुंभ नगरीत साकारलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. फुलांची उधळण, पारंपरिक संगीत आणि साधू-संतांच्या प्रतिकृतींनी सजलेली ही नगरी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या प्रसंगी आ.विक्रांत पाटील यांनी सर्व माता भगिनी, युवा शक्ती, जेष्ठ नागरिक सर्वांनाच गुढीपाडवा आणि नवं वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Comments