श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा...
श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

नेरुळ /(पनवेल वैभव)  - : श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन आगरी कोळी भवन नेरूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. 
       यावेळी वनमंत्री गणेश नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थांचा गुणगौरव व संस्थेसाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. मंत्री गणेश नाईक यांनी संस्थेच्या सामाजिक योगदानाबद्दल व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, संस्थेचे सचिव जगदीश जाधव तसेच संस्थेतील सदस्यांचे या सामाजिक कार्याबद्दल विशेष कौतुक केले व संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली.यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार दीपक आबा साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोट.
श्री.गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट मागील २६ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच अनाथ,अपंग व शिक्षणापासून दुर्बल असणाऱ्या घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.तसेच या संस्थेतून गतवर्षी एक अनाथ विद्यार्थी सी.ए परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला.आजपर्यंत शेकडो माध्यमिक,उच्च माध्यमिक,तंत्र शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले.राज्यातील हजारो अनाथ विद्यार्थ्यांसाठी संस्था एक आशेचा किरण आहे.
Comments
Popular posts
बेलपाडा प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडून दखल ; आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला गती...
Image
आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या महर्षी वाल्मिकी समाज सभागृहाचे जयंतीदिनी लोकार्पण....
Image
भीमाशंकर येथील झाडांच्या विनाशाबद्दल पनवेलच्या निसर्ग प्रेमींची मूक निदर्शने...
Image
वैश्य युवा सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; खोपोलीत विद्यार्थी गुणगौरव व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
Image
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी - व्यवसायाचा मार्ग मोकळा ; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या बैठकीत महत्त्वाचे आश्वासन...
Image