ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सायकलिंग स्पर्धेत खारघरच्या स्नेहल शत्रुघ्न माळी ने पटकाविले रौप्यपदक...
पनवेल / प्रतिनिधी : -
सुवर्ण मंदीर अमृतसर येथील पंजाब च्या पावनभुमीत दि. 18 ते 21, 2026 ला झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत खारघर ची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने (रौप्य)सिल्वर पदक प्राप्त केले आहे.
याआधी स्नेहल माळी हिने शालेय सायकलिंग अजिंक्य स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. अनेक राष्ट्रीय स्पर्धेत स्नेहल ने अनेक पदके यापूर्वी प्राप्त केली आहेत.स्नेहल चे वडिल हे सध्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर नवी मुंबईत कार्यरत आहेत.
सध्या स्नेहल बालेवाडी येथे फिनिक्स सायकलिंग अँकेडिमीचे चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग करीत आहे. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष अॅड विक्रम रोठे, उपाध्यक्ष अविनाश कदम, ,सचिव प्राध्यापक संजय साठे सर यांनी तिच्या या विजयाबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच आमदार प्रशांत ठाकुर व नगरसेवक मधु पाटील, प्रविण पाटील, ब्रिजेश पटेल यांनी देखील तिचे आभिनंदन केले आहे.