कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपूर्ण टप्पा पार..
कुंडेवहाळ येथील १६९ मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण...

पनवेल वैभव (प्रतिनिधी) एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्वपुर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व  इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी आज कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या ब्रेक थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला. 
कुंडेवहाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर च्या जेएनपीटी-वैतरणा सेक्शनमधील एक महत्वाचा भाग आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणा पर्यंत सुमारे १०२ किलोमीटर लांबीचा आहे. हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गामुळे जेएनपीटी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे. वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिक्सच्या खर्चात बचत होणार आहे. 
तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून उद्योग आणि व्यापारासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर पडणार आहे. वैतरणापासून ते जेएनपीटी हा १०२ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. टाटा प्रोजेक्ट लिमीटेड कंपनी हे काम करत आहेत तर सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टीआयपीएल हे काम करत आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पातील महत्वाच्या अशा कुंडेवहाळ येथील १६९ मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर बुधवारी कुंडेवहाळ येथे टनल ब्रेक थू सोहळा पार पडला. यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बटन दाबून या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले. यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर परमजीत सिंग, टाटा प्रोजेक्ट लिमीटेडचे उप्पलपती व्यंकट कुमार, राजकुमार शर्मा, साहिल शर्मा, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डायरेक्टर एम.पी. त्यागी, महादेव यादव, प्रकाश पाटील, यल्लालिंग दिगी, कपील कड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी परेश ठाकूर यांनी सांगितले, या प्रकल्पामुळे 
मालवाहतूक वेगाने होईल आणि नॅशनल लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, त्यामुळे वाहतूकदारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. टाटा प्रोजेक्ट लिमीटेड कंपनीकडे हे काम असून टीआयपीएल सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून योग्य वेगाने हे काम पुर्ण करत आहे, असे सांगून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच पनवेल आणि उरण मध्ये हे प्रकल्प होत असल्याने याचा फायदा परिसरातील नागरीकांना नक्कीच होईल असेही परेश ठाकूर यांनी अधोरेखित केले.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image