आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विशेषांक प्रकाशन व रायगड सम्राट पुरस्कार वितरण सोहळा ...
पनवेल (प्रतिनिधी) शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट न्यूज वेब पोर्टलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचा प्रकाशन आणि रायगड सम्राट पुरस्कार वितरण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज (१५ मार्च) मोठ्या उत्साहात नवीन पनवेल येथे संपन्न झाला.
यावेळी रायगड सम्राटचा गान सम्राट पुरस्कार प्रसिद्ध गायक रवींद्र जाधव, उद्योग रत्न पुरस्कार प्रयाग बिल्डरचे प्रदीप भोपी, समाजरत्न पुरस्कार मेहबूब याकूब शेख, उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रवीण मोहोकर, तर क्रीडा क्षेत्रासाठी उत्कृष्ट कबड्डीपटू कु. तेजस्विनी इंगोले हिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नील हॉस्पिटलच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, डॉ शुभदा निल, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, निलेश सोनवणे, भाजपा नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, युवा नेते प्रतीक बहिरा, भारत भोपी, पत्रकार मयूर तांबडे, संतोष भगत, गणपत वारगडा, संतोष आमले, संतोष सुतार, अनिल कुरघोडे, आप्पासाहेब मगर, रवींद्र पाटील, अण्णासाहेब आहेर,अक्षय कांबळे सचिन भोळे, विजय इंगोले,अशोक आखाडे, विशाल सावंत मुकुंद कांबळे, कैलास नेमाडे, अक्षय भगत आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी रायगड सम्राट चे कौतुक करत तृतीय वर्धापन दिनानिमित्त संपादक शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच शंकर वायदंडे रायगड सम्राट च्या माध्यमातून समाजाचा आरसा समोर ठेवत असून समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत पुरस्कार प्राप्त मानकरींचे अभिनंदनही केले.