आदई येथे ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे पारायण सप्ताह सुरु..
आदई येथे ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे पारायण सप्ताह सुरु

पनवेल/मनोहर पाटील
आदई येथे गेल्या 46 वर्षांपासून सुरु असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे पारायणाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे 47 वे वर्ष असून अतिशय भक्तीभावाने हे पारायण सुरु आहे. रविवार दि. 2 पासून यास प्रारंभ झाला असून रविवार दि. 9 रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या निमित्त प्रवचन, किर्तन, हरिपाठ, ज्ञानेश्‍वरीचे पारायण असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदई येथील भगवान गोपाळकृष्ण मंदिर आदई येथे भव्य दिव्य अशा स्वरुपाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. 
बुधवार दिनांक 5 रोजी ह.भ.प श्री शाम महाराज शेळके यांचे प्रवचन सायं. 4 ते 5 तर सायंकाळी 5 ते6 दरम्यान गणेश हरिपाठ महिला मंडळ मोहोचा हरिपाठ, तर रात्री 7 ते 9 दरम्यान ज्ञानेश्‍वर तुळशीदास नामदास महाराज यांचे सुश्राव्य असे हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 6 रोजी सायं. 4 ते 5 दरम्यान ह.भ.प. शेख बाबा महाराज यांचे प्रवचन, सायं 5 ते 6 दरम्यान श्री माऊलीकृपा महिला हरिपाठ मंडळ, उमरोली यांचा हरिपाठ, रात्री 7 ते 9 ह.भ.प.श्री. पुंडलिक महाराज मोरे यांचे हरि किर्तन, शुक्रवार दि. 7 रोजी ह.भ.प. श्री. कृष्णा महाराज पाटील यांचे प्रवचन, सायं 5 ते 6 श्री हनुमान प्रासादिक महिला हरिपाठ सादर करणार आहेत. तर सकाळी 10 ते 12 दरम्यान ह.भ.प. श्री. विक्रांत महाराज पोंडेकर व ह.भ.प.श्री. पांडुरंग महाराज गिरीकर यांचे हरि किर्तन होणार आहे.
शनिवार दि. 8 रोजी सायं. 4 ते 5 दरम्यान ह.भ.प. श्री. बामा महाराज भोपी यांचे प्रवचन, सायं. 5 ते 6 जय योगेश्‍वर महिला मंडळाचा हरिपाठ तर रात्री 7 ते 9 दरम्यान ह.भ.प. श्री. जयेश महाराज पोंडेकर यांचे हरिकिर्तन होणार आहे.
रविवार दि. 9 रोजी पारायणाची सांगता होणार असून या निमित्त सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ यांचे सप्ताह समिती वारकरी सांप्रदाय मंडळ यांनी केले आहे.
Comments