पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन...
पनवेल वैभव / दि.०७(संजय कदम ): महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन उपक्रम राबवला होता. त्यानुसार पनवेल तालुक्यातील नेरे आणि शेडुंग येथे मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्यातील सुकर जीवनमान या विषयांतर्गत पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे महालक्ष्मी नगर सोसायटी नेरे पनवेल व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ शेडुंग येथील इंजिनिअरिंग फार्मसी अँड हॉटेल मॅनेजमेंट चे विद्यार्थ्यांसाठी सरकारी अभिवोक्ता एडवोकेट सी वाय पाटील यांचे मार्फत नवीन फौजदारी कायदे 2023 या संदर्भातील माहिती देऊन नवीन कायद्यांची जनजागृती करण्यात आली. तसेच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी
विकास साळवी यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
*कोट :*
यापुढे देखील नागरिकांचे दैनंदिन जीवन शुक्र व्हावे याकरिता सातत्याने प्रयत्न करणार - पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे.
फोटो: मार्गदर्शन कार्यक्रम