इलेक्ट्रिक वायर आणि साहित्य चोरणार्‍या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड...
टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया बिल्डींग परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वायर व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात पनवेल तालुका पोलिसांनी चौकडीला गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्यातील येथील सुपरवायझर याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पो हवा देवरे , पो.हवा.कुदळे, पो.हवा. धुमाळ, पो.हवा. तांडेल, पो.हवा. बाबर, पो.शि. सोनकांबळे, पो.शि. खताळ, पो. शि. भगत आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आारोपींचा तांत्रिक तपास तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध सुरू केला असता आरोपी  मो.  राशिद मो. नाझीम फारूकी (32),  मो. साहीद अजगर आली (21), मो. आसिफ मो. रेहमान (24), मो. इम्रान शफीक अहमद फारुकी (43), सर्व राहणार धारावी मुंबई यांची माहिती मिळाली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या गाडी नं. एमएच 43 एटी 3919 जिची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे व त्या गाडीच्या आधारे सदर ठिकाणी येवून त्यांनी इलेक्ट्रिक वायर व साहित्य पैकी 3,17,220 रुपये किमतीचा व मोबाईल फोन 20,000/-किमंतीचे असा  एकूण 6,37,220/-रुपयांचा  मुद्देमाल चोरुन नेला होता. या चौकडीला ताब्यात घेताच त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर चौकडीने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे काही गुन्हे केलेले आहेत का? याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image