कळंबोलीत हळदीकुंकू उत्साहात साजरा ...
कळंबोलीत हळदीकुंकू उत्साहात साजरा ...
पनवेल / प्रतिनिधी  - : सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कळंबोली आणि सरस्वती महिला नागरी सह.पतपेढी मर्या.कळंबोली यांच्यातर्फे 2 फेब्रुवारी रोजी कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष कुंदाताई गोळे, सचिव सुषमा कामतेकर यांच्यासह प्रमुख पाहुणे रेखाताई रामदास शेवाळे, सायली तुकाराम सरक, मोनिका प्रकाश महानवर (माजी नगरसेविका भाजप), ज्योती पाटील (कळंबोली शहर प्रमुख, शिवसेना) चंचला बनकर (शहरप्रमुख खारघर), डी. एन मिश्रा, एड. वैशाली पंडित, स्नेहल बागल यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. 
       महिला जे करू शकते ते कोणीही करू शकत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांची देखील भाषणे झाली. या ठिकाणी हळदीकुंकू सोहळ्यात महिलांची एकजूट दिसून आली. महिलांना सोबत घेऊन महिलांच्या उदात्तीकरणासाठी चळवळ उभारणाऱ्या कुंदाताई गोळे यांच्या प्रयत्नांमुळे सर्व थरातील महिलांनी एका व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी महिला आर्थिक काटकसर ते आर्थिक उत्पन्न वाढ या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या हळदी कुंकू समारंभात ज्योत्स्ना गोळे, रूपाली शिवथरे, सुनीता गुरव, अनिता कुलकर्णी, वैशाली सुर्वे, वैशाली महाजन, ज्योती पटेल, सीमा पाटील, पुष्पा शिवजातक, शकुंतला गोगावले, वनिता रिठे, पूजा खानावकर, सुजाता कुरूप यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
Comments