पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर तांबडे ....
पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर तांबडे ....

नवीन पनवेल : पनवेल-नवी मुंबई प्रिंट, डिजिटल पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मयूर गुरुनाथ तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
        पनवेल येथील लालचंद यादव यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून मयूर तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून दीपक कांबळे, सचिव म्हणून लालचंद यादव तर खजिनदार म्हणून मिलिंद खारपाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पनवेल- नवी मुंबई प्रिंट, डिजिटल पत्रकार संघटना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करते. 
यापूर्वी संघटनेच्या वतीने गरीब मुलामुलींना 33 सायकलचे वाटप तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेवेळी स्वागत करणे, धामोळेवाडी येथील मुला मुलींना खाऊ आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले होते. अशाच प्रकारे यापुढे देखील अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे अध्यक्ष मयूर तांबडे यांनी सांगितले. 
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सल्लागार रमेश भोळे, अनिल कुरघोडे, अण्णासाहेब आहेर उपस्थित होते. दीपक घरत, दीपक जगे, समीर वेशवीकर, अशोक गोरडे, पंकज तांबडे संघटनेचे सदस्य आहेत.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image