स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन...


पनवेल वैभव, दि.26 (वार्ताहर) ः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आज सकाळी उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, केशवस्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, मा.नगरसेवक संजय गुरुजी, संजय कदम, भाजप युवा मोर्चाचे अभिषेक पटवर्धन, शिवसेना विभागप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लक्ष्मण पांचाळ, सौ.स्वाती कोळी यांच्यासह केशवस्मृती पतपेढीचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
फोटो ः स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
Comments