इसम बेपत्ता...
                        इसम बेपत्ता...

पनवेल वैभव , दि.22 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील उसर्ली परिसरात राहणारा एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सोमनाथ भाऊराव पाटील (40) असे या इसमाचे नाव असून तो धुरी प्रेम नगर आदित्य बिल्डींग रुम नं.204 उसर्ली येथे राहण्यास होता. रंगाने सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, उंची 5 फुट 5 इंच असून डोळे काळे, डाव्या हातावर हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. अंगात सफेद रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. त्याला मराठी भाषा अवगत असून पायात आहिराणी सॅण्डल घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.8591424350 किंवा पो.ना.अरुण चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.


फोटो ः सोमनाथ पाटील
Comments