अपोलोने हृदय आजारावरील उपचारांमध्ये नवीन तंत्रांचा उपयोग करत केले यश संपादन....
भारतात स्ट्रक्चरल हृदयरोगा विषयी जागरूकता वाढवणे गरजेचे

पनवेल वैभव / नवी मुंबई, २१ फेब्रुवारी २०२५: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने दरवर्षी २२ फेब्रुवारी रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या, हृदयाच्या झडपेच्या आजाराविषयी जागरूकता दिवसाच्या निमित्ताने, आपल्या स्ट्रक्चरल हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हृदयाच्या झडपेच्या आजाराच्या वाढत्या केसेस आणि त्यावर उपलब्ध असलेल्या विविध उपचार पर्यायांविषयी माहिती देऊन जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलने हा पाऊल उचलले. स्ट्रक्चरल हृदय रोग एक असा आजार आहे, जो हृदयाच्या झडपा आणि त्यांच्या चेंबर्सना प्रभावित करतो. दरवर्षी याच्या केसेस वाढत आहेत. हा आजार एकतर जन्मजात असू शकतो किंवा काही विशिष्ट कारणांनी नंतरच्या काळात देखील उद्भवू शकतो.

ऍट्रियल सेप्टल दोष (ASD) आणि वेंट्रीक्युलर सेप्टल दोष (VSD) ही जन्मजात हृदय रोगाची (CHD) उदाहरणे आहेत. त्यांच्यावरील उपचार पीडियाट्रिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट करतात. नंतरच्या आयुष्यात हा आजार ज्या कारणांमुळे उद्भवू शकतो अशांमध्ये ऱ्हुमॅटिक हार्ट डीसिज (आरएचडी), वय वाढणे, कॅल्शियम जमा होणे, आनुवंशिकता इत्यादींचा समावेश असतो. स्ट्रक्चरल हृदय रोगाची अनेक लक्षणे असू शकतात, जसे की, श्वास घेण्यात त्रास होणे, छातीमध्ये वेदना, चक्कर येणे, घाबरणे, पायाचा घोटा, पाय किंवा पोटामध्ये सूज इत्यादींचा त्यामध्ये समावेश असतो. अनेक लोक सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे जागरूकता खूप महत्त्वाची आहे. आजार वेळीच लक्षात आल्यास गुंतागुंत टाळता येऊ शकते.

हृदयाच्या झडपेच्या आजाराविषयी जागरूकता दिवसाच्या निमित्ताने, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आपल्या कार्डियाक तज्ञांसह, जीव वाचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. हे सर्व कार्डियाक तज्ञ कार्डियाक व्हॉल्व आणि रिदम मॅनेजमेंट डिव्हायसेस, पेसमेकर आणि वेंट्रीक्युलर सहायक उपकरणे यासारख्या प्रगत स्ट्रक्चरल हृदय उपकरणांचा उपयोग करण्यात प्रशिक्षित आहेत. सर्व कार्डियाक तज्ञांनी भर दिला की, हृदयाच्या आजारांचे लवकरात लवकर निदान केले जावे यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

डॉ राहुल गुप्ता-सिनियर कन्सल्टन्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, स्ट्रक्चरल हार्ट डीसिज अँड रिदम डिसऑर्डर स्पेशालिस्ट, व्हॉल्व एक्स्पर्ट - टीएव्हीआय, टीएमव्हीआर, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"प्रगत मिनिमली इन्वेसिव (ज्यामध्ये शरीरावर कमीत कमी चिरा दिल्या जातात, रक्तस्त्राव कमीत कमी होतो) उपचार करून रुग्णांना निरोगी जीवन जगण्याची आणखी एक संधी देण्यात आम्ही सक्षम आहोत. आमच्या एक रुग्ण ७३ वर्षांच्या महिला खूप कमजोर झाल्या,  त्यांच्या तब्येतीमध्ये खूप जास्त गुंतागुंत होती, त्यामुळे त्यांच्यावर ओपन हार्ट प्रक्रिया करणे खूप धोकादायक होते. त्यांना ऱ्हुमॅटिक हार्ट डीसिज (RHD) आधी झालेला होता, ज्यासाठी २०१७ साली त्यांचे मिट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट केले गेले होते. ECG मध्ये समजले की, त्यांना गंभीर ट्रायक्यूस्पिड व्हॉल्व आजार आहे. पारंपरिक प्रक्रिया त्यांच्यासाठी व्यवहार्य पर्याय ठरल्या नसत्या, आम्ही TRIC व्हॉल्व प्रक्रिया केली, ज्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. त्या रुग्ण महिलेला दुसऱ्या दिवशीच घरी पाठवण्यात आले, त्यांच्या कामे करण्याच्या क्षमतेमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाली आहे."

डॉ महेश घोगरे - सिनियर कन्सल्टन्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, स्ट्रक्चरल हार्ट डीसिज, टीएव्हीआय स्पेशालिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले, "९१ वर्षांचे पुरुष रुग्ण सुरुवातीला डेंटल प्रोसिजरसाठी आले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांना दोनदा चक्कर आली होती. तपासणीमध्ये समजले की, त्यांना गंभीर एओर्टिक स्टेनोसिस होते. सर्जरी करण्यात खूप जास्त धोका होता, त्यांना ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व इम्प्लान्ट यशस्वीपणे केले गेले. पारंपरिक व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरीला हा एक मिनिमली इन्वेसिव्ह पर्याय आहे. आज ते आपली सर्व नियमित कामे आरामात करू शकत आहेत आणि या प्रक्रियेने त्यांना एक नवे जीवन बहाल केले आहे."
Comments