समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा
उरण : समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांनी उरणचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक यांनी 190 उरण विधानसभेचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकनचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी देखील पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पनवेल आणि उरण मध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढली आहे. नागरिकांनी पनवेल आणि उरण मध्ये शेकापच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन अनिल नाईक आणि महेश साळुंखे यांनी केले आहे.
शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेशाचा ओघ कायम पनवेल : शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा ओघ कायम असून खोपटा आणि कोली कोपर येथील कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. शेकापमध्ये वाढत्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांना धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आणि चेतन म्हात्रे यांनी पक्षात स्वागत केले.
खोपटा येथील भाजपचे युवा नेतृत्व दिलीप ठाकूर, चंद्रकांत घरत यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेचे युवा नेतृत्व प्रशांत पाटील, नवनाथ पाटील, गन्नाथ पाटील, विकी पाटील, विनोद पाटील, यांनी तर काँग्रेसचे रोहित पाटील, चंद्रकांत पाटील, शरद घरत यांनी शेकाप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सुरेश पाटील, रमाकांत पाटील, संदीप गावंड, अरुण पाटील, अजित म्हात्रे, हरेंद्र गावंड, संग्राम पाटील यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश करण्यात आला. तर पारगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कोली कोपरचे गोकुळ गोमू नाईक यांनी शेकापमध्ये प्रवेश करत प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला. यावेळी वासुदेव भोईर, संदीप नाईक, अमृत भोईर, महेंद्र नाईक, रॉकी नाईक, शरद भोईर आणि त्यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून शेकाप मध्ये इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याने शेकापला बळकटी येत आहे.