केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठेत
महायुतीचे उमेदवार लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
पनवेल (प्रतिनिधी) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांची रविवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजता कामोठे येथे जाहीर सभा होणार आहे.
सेक्टर ११ मधील सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे होणाऱ्या या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भीमसेन माळी, शिवदास कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकर कांबळे, यांच्यासह महायुतीतील इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.