महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा...
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा


पनवेल: महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. बाळाराम पाटील यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे.
      आम आदमी पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 रायगड जिल्हा करता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे पत्र डाॅ. रियाझ पठाण - प्रदेश संघटन मंत्री - महाराष्ट्र राज्य, यांनी दिला आहे. यावेळी ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे, समन्वयक- पनवेल  विधानसभा, चिमाजी शिंदे - संघटन मंत्री - पनवेल विधानसभा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर्फे बाळाराम पाटील हे निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी,  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर चळवळीतील इतर सहकारी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image