लोकल चर्च पनवेलचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा ..
लोकल चर्च पनवेलचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा 
पनवेल (प्रतिनिधी) लोकल चर्च पनवेल (प्रोटेस्टंट) यांच्याकडून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील पाठिंबा पत्र लोकल चर्चचे चेअरमन एस. ए. श्रींगारे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे आज सुपूर्द केले. 
          या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, नवीन पनवेल व आसपासच्या परिसरात मराठी ख्रिस्ती बांधव वास्तव्यास आहेत. आजपर्यंत लोकल चर्च पनवेलच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे.  यावेळीही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांतजी ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा देत असून ते प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी या समर्थन पत्रातून व्यक्त केला आहे. 
Comments