उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभांचे आयोजन...
उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभांचे आयोजन 
उरण : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मोटरसायकल प्रचार फेरी आणि जाहीर सभांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे.
      शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सहा मोटरसायकल प्रचार फेरी आणि सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत जाहीर सभेचे आयोजन उरण नगरपरिषद डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान उरण येथे करण्यात आले आहे. शनिवार 16 नोव्हेंबर रोजी उलवे नोड येथे दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत मोटरसायकल प्रचार फेरी आणि सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत उलवे नोड, प्लॉट नंबर 69, सेक्टर 5 उलवे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 17 नोव्हेंबर रोजी करंजाडे येथे दुपारी दोन ते चार मोटरसायकल प्रचार फेरी आणि सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत सेक्टर 4, प्लॉट नंबर 42 करंजाडे येथे जाहीर सभा होणार आहे. रविवार 17 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत मोहोपाडा येथे मोटरसायकल प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी सात ते दहा वाजता मोहीपाडा, अचानक क्रिकेट क्लबचे मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या मोटरसायकल प्रचार फेरी आणि जाहीर सभांना कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image