पळस्पे फाटा येथे तपास कारवाईमध्ये तीन लाख ऐकोन पन्नस हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त..
पळस्पे फाटा येथे तपास कारवाईमध्ये तीन लाख ऐकोन पन्नस हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त..
पनवेल वैभव, दि.5 (वार्ताहर) ः  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल 188 विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत भरारी पथक क्र.01 (एफएसटी- पथक) ने आज दि. 05 नोव्हेंबर 2024 रोजी बेकायदेशीर रोकड, अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, बाहन तपासण्याचे कर्तव्य करत असताना सकाळी साधारणत: 9.55 वाजण्याचे दरम्यान मुंबई -गोवा हायवे येथील पळस्पे फाटा चेक नाका येथे रोडवरुन जाणार्‍या गाडी क्र. एमएच-46-बीएम-8620 सुपर कॅरी टेम्पो सिल्व्हर रंगाची चार चाकी गाडीला थांबवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये 249500/- मात्र रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम भरारी पथक क्र. -1 मार्फत जप्त करण्यात आली आहे.
सदर कारबाई 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारबाई वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,  संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरिक्षक, विजय फासे, सहाय्यक खर्च निरिक्षक, संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी, शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी.एस.बहिरम, सहा.समन्वयक आचारसंहिता कक्ष, दिनेश भोसले, तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच भरारी पथक क्र. -1 पथकाचे प्रमुख लक्ष्मण जाधव, सहा.पथक प्रमुख, सचिन पवार, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दौलराव माने, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पो.ह. राम म्हात्रे, कामोठे पोलीस ठाण्याचे पो.शि. गणपती पाटील, खारघर पोलीस ठाण्याचे भूषण चौधरी उपस्थित होते.


फोटो ः हस्तगत केलेली रोख रक्कम
Comments