सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा ...
सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा 
 
पनवेल : करंजाडे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
      उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापचे प्रीतम जे एम म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विविध संघटनांचा, पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रीतम म्हात्रे हे उरणचे आमदार व्हावे ही काळाची गरज आहे. ते तरुण उमेदवार असल्याने आणि उरणचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन विनोद साबळे यांनी केले. 
Comments