समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये..
समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये 
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. 
        यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, तालुका उपाध्यक्ष एस. के. नाईक, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते सी.सी.भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, अमरीश मोकल, युवा नेते प्रतीक सादरानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निल पुजारा यांच्याकडे युवकांची फळी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image