पनवेल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संविधान गौरव दिन रॅली संपन्न...
पनवेल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संविधान गौरव दिन रॅली संपन्न...
 
पनवेल वैभव वृत्तसेवा : - 
२६ नोव्हेंबर २०२४ भारतीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर विधानसभा मतदारसंघ व दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे एस.जी.डी. पब्लिक स्कूल खांदा कॉलनी पनवेल येथून संविधान गौरव रॅली काढण्यात आली खांदेश्वर, कामोठे, खारघर, पनवेल शहर पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय पनवेल, महानगरपालिका पनवेल अग्निशमन दल, सिकेटी कॉलेज एनसीसी युनिट येथे जाऊन संविधान उद्देशिकेचे समूहवाचन करण्यात आले व भारतीय संविधाना प्रतीनिष्ठा राखण्याची सर्वांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष व दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर देवधेकर सर यांच्या हस्ते सीकेटी प्राचार्य एस के पाटील, एनसीसी युनिट एनसीसी मेजर उद्धव डॉ. उद्धव भंडारी पनवेल तहसीलदार विजय पाटील, पनवेलमहानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे ,पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी आनंद गोसावी, महानगरपालिका अग्निशमन दल सब ऑफिसर फतेसिंग गायकवाड ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर नितीन ठाकरे ,खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे ,कामठे पोलीस ठाणे खारघर पोलिसांनी यांना संविधान व संविधान उद्देशिकेची प्रत देण्यात आली व इतर सर्वांना सर्वांना उद्देक्षिका देण्यात आली. 
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष किशोर देवधेकर सर, राष्ट्रवादी सहकार विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष महेश कुमार राऊत, राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत लोखंडे, राष्ट्रवादी कामोठे शहराध्यक्ष अजिनाथ सावंत, खारघर शहराध्यक्ष ग्रामीण अनिल पाटील, दृष्टी फाउंडेशनच्या सचिव सौ नम्रता देवधेकर, सुनील सूर्यवंशी, अरुण कांबळे, भाऊसाहेब लबडे, आदी प्रमुख उपस्थित होते.
Comments