महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा ...
महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा  


पनवेल वैभव (प्रतिनिधी) पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.  
           भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा मतदार संघातून विजयाचा चौकार मारण्यासाठी मतदार बंधू भगिनींच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने पद्मशाली समाज कामोठे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. या संदर्भात समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या पाठिंबा पत्रात, पनवेल विधानसभा महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पद्मशाली समाज कामोठेचा जाहीर पाठींबा देत असून आमचा संपूर्ण समाज विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही, असे नमूद करून  समाज १०० टक्के आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची ग्वाहीही दिली आहे. 
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image