प्रितमदादा म्हात्रे यांचा वादा १०० दिवसात १००० नोकऱ्या देणार..
प्रितमदादा म्हात्रे यांचा वादा १०० दिवसात १००० नोकऱ्या 
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल उरण तालुक्यातील युवकाकडे शिक्षण आहे माञ योग्य प्रशिक्षण नसल्याने येथे येवू घातलेल्या विकासात त्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही युवकाना भेडसावणारी ही  समस्या सोडवण्यासाठी  आपण 100 दिवसात  1000 युवकाना नोकऱ्या मिळवून देणार असल्याची घोषणाच प्रितम म्हाञे यानी केली आहे.  
पनवेल तालूक्यातील उलवे येथे निवडणूक प्रचारार्थ प्रितम म्हाञे याची सभा झाली. यावेली बोलताना ते म्हणाले की येथील युवक शिकलेला आहे माञ त्याचेकडे योग्य प्रशिक्षण अभावी त्याला नोकरी मिळत नाही ही गोष्ट विचारात घेवून आपण युवकाना प्रशिक्षण  देण्याचे काम सुरू केले आहे गेल्या काही महिन्याच्या मेहनतीतून आपण प्रशिक्षण  घेतलेल्या 44 युवकाना मुंबई विमानतळात नोकरी देण्यात यशस्वी झालो त्यामुळे मला विश्वास आहे की भविष्यात आपण या प्रशिक्षणाच्या बळावर 100 दिवसात 1000 नोकऱ्या देण्याचा निर्धार आहे.
आणि तुमच्या आशीर्वादाने निवडून आल्यास तालुक्यातील बेरोजगाराचा प्रश्न कायमचा निकाली काढू त्यासाठी जोरदार शीट्टी वाजवावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेली बोलताना सचीन ताडफलळे म्हणालो की आज नोकरऱ्या शिक्षण आरोग्य असे सर्वच प्रश्न गंभीरझाले आहेत माञ नोकऱ्यांच्या प्रश्न जीवनमरणाचा आहे त्यासाठी प्रितम म्हाञे हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत त्यानी जेएम म्हाञे ट्रस्ट व शेकापच्या वतीने युवकाना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे  गेल्या काही महिन्याच्या परिष्रमातून त्यानी 44युवकाना नोकराया देण्यात यश मिलविले .हातात कोणती सत्ता नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकर्या देण्याचे काम मोठे आहे.भविष्यात हाती सत्ता आल्यास तरुणाना लाखो नोकर्या मिलवून देवू शकतात. येथील नागरीकाना मुलाच्या प्रवेशाचा प्रश्नही दरवर्षी सतावतो. सरकार ८ वी पर्यंत मोफत शिक्षण देते माञ मुजोर संस्थाचालक मोठी फी आकारतात नागरीकाची ही समस्या शेकाप आपल्या पध्दतीने सोडविल हे सरकार महिलाना 1500रू देते पण आपली ही लाडकी बहिण दिर्घायुषी निरोगीही राहिली पाहिजे त्यासाठी प्रितमदादानी महिला कर्करोग निदान व उपचार उपलब्ध करून दिले आहे  मेमोग्राफीप्रतिबंधक लस देण्याचाही त्यांचा मानस आहे समाजासाठी अशी कामे करणारा युवा उमेदवारालाच विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image