स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी तर्फे वाल्मिकी समाज सेलच्या विविध पदाधिकार्‍यांची नेमणूक..
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी तर्फे वाल्मिकी समाज सेलच्या विविध पदाधिकार्‍यांची नेमणूक
पनवेल वैभव, दि.9 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज वाल्मिकी समाजसेलच्या विविध पदाधिकार्‍यांची नेमणूक केली.  
त्यामध्ये सुनील दयानंद कुमार यांची रायगड जिल्हा अध्यक्ष - वाल्मीकी समाज सेल या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच अजित रवींद्र खेरवाल यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीकी समाज सेल या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. व श्यामलाल जीवनराज घारू यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुख वाल्मीकी समाज सेल या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. महेश साळुंखे यांनी त्यांना पुढील राजकीय सामाजिक वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा दिलेले आहेत. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे व महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष अनिकेत संसारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
फोटो ः नियुक्ती पत्र देताना
Comments