आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह..
आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह 

पनवेल (प्रतिनिधी) उरण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून ४० लाख ५५ हजार रुपये खर्च करून गुळसुंदे येथे सामाजिक सभागृह उभारण्यात आले असून या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. 
              उरण विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक विकासकामे करण्याचा विक्रम आमदार महेश बालदी यांनी केले आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात विकासकामे करून त्यांनी आदर्श लोकप्रतिनिधी असल्याचे अधोरेखित केले आहे. विभागातील समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केले आहेत. आदिवासी वाड्या-पाड्यात स्वतः जाऊन त्यांनी तेथील समस्या समजून घेतल्या त्यामुळे दुर्गम भागातही त्यांच्याकडून विकास झाला आणि हा विकास उरण विधानसभा मतदार संघातील जनतेला पहायला मिळाला आहे. 
            गुळसुंदे येथील सामाजिक सभागृहाची बिकट अवस्था झाली होती त्या कारणाने वारंवार डागडुजी करूनही उपयोग होत नव्हता, त्यामुळे येथील तरुणांनी त्या जागी नवीन वास्तू उभारण्यासाठी १० ते १५ लाख रुपयांची निधी देण्याची मागणी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली होती. त्यावेळी आमदार महेश बालदी यांनी ताबडतोब होकार देत एक मजल्याऐवजी दोन मजली इमारत बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने ४० लाख ५५ हजार रुपयांचा निधी खर्च करून दोन मजली इमारत, त्यामध्ये तळ मजल्यात मोठे सभागृह, पहिल्या मजल्यावर दोन खोली तसेच आणखी एक सभागृह आणि त्यानंतर टेरेस व त्यावर पत्र्याची शेड अशाप्रकारे सामाजिक सभागृहाची उभारणी करण्यात आली असून एक आदर्श वास्तू समाजासाठी लोकाप्रित करून आमदार महेश बालदी यांनी वचनपूर्ती केली. त्याबद्दल येथील ग्रामस्थांच्यावतीने आमदार महेश बालदी यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना धन्यवाद देण्यात आले. 
            या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनिल माळी, प्रवीण खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद विद्वांस, चिंतामण कडवे, शरद ठाकूर, सुनील पालकर, सरपंच मीनाक्षी जगताप, ग्रामपंचायत सदस्य सतिश साठे, सदस्या अपर्णा चौलकर, सदस्या आशा वीर, माजी सदस्या लता साठे, महादेव कांबळे, अनिल पाटील, संतोष चौलकर, संतोष साठे, मधुकर पाटील, राजा पाटील, अजिंक्य सुर्वे, प्रशांत पाटील, स्वप्निल चौलकर, वैभव भोईर, मनिष साठे, सचिन गायकवाड, आतिष भोईर, सचिन कोळंबेकर, दीपक पारंगे, गजानन वीर, संकेत चौलकर, अशोक मालुसरे, योगेश पालकर, सुजय बोनकर, प्रमिला साठे, वनिता शिर्के, ऋतुजा कडवे, नम्रता कडवे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image