अदाणी फाउंडेश रायगड रोहा येथे उभारणार सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय..
रुग्णालयात स्थानिक नागरिकांना माफक दरात तपासणी आणि उपचार सेवा मिळणार..
पनवेल वैभव / रोहा, १८ ऑक्टोबर  - : 
अदाणी फाउंडेशन कडून रायगड, रोहा येथे ३० बेडचे सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे,  विधान सभा सदस्य अनिकेत भाई तटकरे, अदाणी फाउंडेशन सीईओ डॉ अभिषेक लख्टाकिया, दिघी पोर्ट सीईओ कपिल कुमार खंडेलवाल, अदाणी फाउंडेशनचे शैलेश पटेल, सुबोध कुमार सिंह आणि जयश्री काळे, वरदा ताई तटकरे, वेदांती तटकरे, गीता मोरे सरपंच रोठ खुर्द, अमित मोहिते सरपंच वर्से, सुरेश मगर सरचिटणीस रांकापा, विजयराव मोरे(प्रदेश सरचिटणीस, राकापा) मधुकर पाटील (जिल्हाध्यक्ष राकापा), सुदर्शन साईट हेड विवेक गर्ग उपस्थित होते. अदाणी फाउंडेशन माध्यमातून रोहा येथे सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येत्या सहा महिन्यात उभारण्यात येणार आहे.

या रुग्णालयामुळे स्थानिक नागरिकांचा आरोग्यावर होणारा खर्च, धावपळ आणि वेळ वाचणार आहे. मुंबई किंवा दूरवर जाऊन उपचार घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी अदाणी फाउंडेशनने हा पुढाकार घेतला आहे. या रुग्णालयात तातडीच्या वैद्यकीय सेवांपासून ते अपघातग्रस्त रुग्णांच्या आपत्कालीन व्यवस्थापन पर्यंत सर्व सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय, हे रुग्णालय स्थानिक रोजगार निर्मितीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, ज्यामुळे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे. स्थानिक नागरिकांना माफक दरात तपासणी आणि उपचार सेवा मिळतील, त्यामुळे बाहेरील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांवर भार कमी होईल. या रुग्णालयात शल्यचिकित्सा, डोळे, कान-नाक-घसा तज्ञ, स्त्री-रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, दंतचिकित्सा, आणि डायलिसिससह विविध वैद्यकीय सुविधा असतील. त्यात आइसीयु, ऑपरेशन थिएटर, ओपीडी, एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, 2D इको, टीएमटी आणि औषध वितरण सेवाही उपलब्ध असतील.

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले यावेळी तटकरे साहेब म्हणाले,“रोहा येथे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधल्याबद्दल मी अदानी फाऊंडेशनचा खूप आभारी आहे. रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी हे रुग्णालय अतिशय फायदेशीर ठरेल.आसपासच्या सर्व तालुक्यातील लोकांना अत्यंत उच्चतम दर्जाची सेवा इथे उपलब्ध होणार. या प्रसंगी अदाणी फाउंडेशनच्या मुख्य कार्य पालन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदाणी फाउंडेशन स्थानिक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण तसेच गरीब जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.''

अदाणी फाउंडेशन १९९६ पासून सामाजिक विकास आणि शाश्वत आजीविका क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सध्या १९ राज्यांतील ६७६९ गावांमध्ये ९२ लाख लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्याचे काम करत आहे. दिघी पोर्ट येथील आसपासच्या १५ गावांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उपक्रम, मोबाईल हेल्थ केअर युनिट, कुपोषण निर्मूलन अंतर्गत पोषण कार्यक्रम, शेतकरी वर्गासाठी त्यांचा शाश्वत आजीविका विकासासाठी ८७ शेतकऱ्यांना २७९४ हापूस आंबा, नारळ, सुपारी, फणस आणि चिकू ची झाडं वाडी विकास योजने अंतर्गत देण्यात आली आहे. महिला सशक्तीकरण क्षेत्रात बचत गट तयार करण्यात आले असून महिलांनी १.३७ लाख उत्पन्न कमावले आहे
Comments