भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांना ''लोकमत लोकनेता" विशेष पुरस्कार..
भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांना ‘लोकमत लोकनेता’ विशेष पुरस्कार
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः  लोकमत समूहाच्या वतीने राजकीय क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी केलेल्या विशेष व्यक्तिमत्त्वांचा विशेष सन्मान ‘लोकनेता पुरस्कार’ देऊन नुकताच करण्यात आला. यामध्ये भाजपचे नेते, कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील यांना हा ‘लोकनेता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा लोकनेता पुरस्कार विधानसभेचे अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते बाळासाहेब पाटील यांना देण्यात आला.हा लोकमत ‘लोकनेता सन्मान पुरस्कार’ सोहळा यशवंत राव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाला.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक निष्ठावान नेतृत्व म्हणून श्री.बाळासाहेब पाटील यांची विशेष ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री.बाळासाहेब पाटील यांनी 40 वर्षे अथक परिश्रम घेतले आहेत. स्वतःला राजकारणात काहीतरी मिळावे म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची मोठी मालिकाच महाराष्ट्रात बघायला मिळते परंतु अशा राजकीय परिस्थितीत श्री.बाळासाहेब पाटील यांच्यासारखी काही ठराविकच उदाहरणे बघायला मिळतात की जे स्वतःच्या हितापेक्षा पक्षाचे आणि समाजाचे हित मोठे मानतात आणि  त्यामुळे जनमानसात त्यांची  एक संघर्षमय नेतृत्व म्हणून विशेष ओळख आहे. गेली अनेक वर्ष प्रचंड मेहनत घेत समाजाच्या कल्याणासाठी असंख्य प्रश्नांना वाचा फोडत प्रसंगी आक्रमक होत त्यांनी अनेक विषयांना न्याय मिळवून दिला आहे आणि त्यामुळे गोरगरीब जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेले नेतृत्व म्हणून त्यांना नेहमीच पसंती मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीसाठी खडतर असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांबरोबर गेली अनेक वर्षे अविरतपणे कार्य करत पक्षाची ताकत वाढविण्याचे काम बाळासाहेब पाटील यांनी केल्याने त्यांच्या मागे हितचिंतकांची एक मोठी ताकत नेहमीच राहिली आहे. सहकार क्षेत्रातही आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवत पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र मोट बांधत पनवेल तालुक्यातील मानाच्या मानल्या जाणाऱ्या पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन म्हणून तोट्यात असलेल्या बँकेला नफ्यात आणण्याचे काम श्री. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात झाले आहे. कोकण महाडा सभापती कार्यरत असताना गोरगरीब जनतेला स्वतःच हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कामगिरी केली आहे गोरी गरिबांना ही घरे सोप्या पद्धतीने मिळण्यासाठी अनेक ठोस निर्णय त्यांनी घेतले असल्याने अनेक गोरगरीब जनतेच्या आशीर्वाद लाभले व त्यांची ही कोकण महाडा सभापती कारकीर्द यशस्वी ठरली. जनतेशी नाळ जोडलेल्या एका संघटनशील नेतृत्वाचा लोकनेता पुरस्कार देऊन लोकमत समूहाने सन्मान केल्याने नागरिकांमध्ये एक चांगला संदेश गेला आहे. अनेक नागरिक हितचिंतकांकडून श्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमास राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे नेते माजी आमदार नांदगावकर, नितीन सरदेसाई, लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, उपाध्यक्ष विजय शुक्ला, संपादक अतुल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी लोकनेता नसून लोकसेवक असल्याचे विनम्रपणे सांगितले.
Comments