भिंगार येथे जागतिक अन्न दिन साजरा...
पनवेल/प्रतिनिधी:* रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगारच्यावतीने लोकांमध्ये पौष्टिक अन्न आणि चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक अन्न दिन साजरा केला. सकस आहार आणि आहाराच्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेने आयोजन केले.
हेल्दी फूड देखील चविष्ट असू शकते हे याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. त्यांनी "निरोगी हृदय, निरोगी शरीर" हा संदेश दिला होता.
विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैली आणि पौष्टिक आहार तक्त्याची माहिती देण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला लवटे यांनी विविध आंतरराष्ट्रीय पाककृती, मूलभूत टेबल शिष्टाचार आणि नीतिमत्तेबद्दल अतिरिक्त ज्ञान असलेल्या अशा उपक्रमांनी "जागतिक अन्न दिन" अधिक समृद्ध आणि अद्भुत अनुभवावर भर दिला.या कार्यक्रमास भिंगारचे ग्रामपंचायत अधिकारी अनिल चौधरी,पेणचे केंद्र प्रमुख चक्रपाणी भगत यांनी भेट दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.