ऑक्टोबर सेवा आठवडा निमित्त कार्यक्रमांचे नियोजन..
लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231-A1 या संघटनेच्या वतीने मासिक सर्वसाधारण सभा दि.२८/९/२०२४ रोजी राष्ट्रीय मिल मजदुर संघ, कॉन्फरन्स हॉल, जी.डी. आंबेडकर रोड, परेल येथे मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे सर अध्यक्षते खाली पार पडली.
सदर सभेत पदाधिकारी व सदस्य यांना नुकत्याच येणाऱ्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे कार्यक्रम दादर येथे होणारे रक्तदान शिबिर,एसआरसीसी रुग्णालय हाजीअली येथे पोलिओ,अवयव दान व किडनी उपचार शिबिर, प्रिन.वामनराव महाडिक उद्यान येथे वृक्षारोपण, के.ई.एम्. रुग्णालय व संत गाडगे महाराज वृध्दाश्रम दादर येथे अन्नदान व या सेवा सप्ताहात होणाऱ्या इतर कार्यक्रमाच्या सूचना व संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगी ,लायन सौ.अनुराधा हेगडे, सचिव लायन श्री.विजय रायमाने, खजिनदार लायन श्री.विलास डांगे,फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ, लायन श्री.गोविंदराव मोहित, लायन श्री.सुभाष भोसले,लायन श्री.दिलीप वरेकर,लायन श्री.अशोक पवार,लायन प्रज्ञा बाईत, लायन श्री.दीपनारायण शुक्ला,लायन श्री.नितीन कोलगे,लायन श्री.उदय अशोक पवार व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.