मदरसा ए आयशा मस्जिद व श्री साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर...
पनवेल, (वार्ताहर) :
ईद ए मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती
जगाला सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचं प्रतीक असणाऱे हजरत मोहंमद पैगंबर त्यांनी दिलेला समता-बंधुत्व-प्रेमाचा संदेश सामाजिक सलोखा निर्माण करणारा ठरावा म्हणून जगभरात लोकोपयोगी ,मानव कल्याणकारी अनेक अभिनव उपक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबविले जातात. त्याचप्रमाणे तळोजा फेज 1 सेक्टर 2 येथील मदरसा ए आयशा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी " सर्वश्रेष्ठ दान रक्तदान " या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी केला.रक्तदात्यांच्या स्तुत्य कार्य समाजाला प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरत असल्याने यावेळी त्यांचे सत्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात अल्पसंख्याक नेत्या सुलताना चांद बीबी वंशज ज्येष्ठ समाजसेविका अनिशा शेख यांनी उपस्थिती दाखवत रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले व सर्वांना ईद ए मिलाद च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आयोजक म्हणून अफरोझ भाई,नियाझुद्दीन नडवी, दिलावर चौगुले ,गुल्फाम पारकर,सलीम दलवी, शोएब सुर्वे, माजदार मुलाजी,हाजी सलीम रतांशी,नौफिल सय्यद तसेच एम. जी. एम.श्री. साई ब्लड सेंटर सदस्य व अल्पसंख्याक समाज व संस्था ,प्रसार माध्यम प्रतिनिधी व स्थानिक सर्व धर्मियांनी मिळून महारक्तदान शिबिरात मोठया प्रमाणात सहभाग घेतला.