कळंबोलीत महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा जिवंत देखावा राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळाने केले समाज प्रबोधन..
राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळाने केले समाज प्रबोधन.


कळंबोली (दीपक घोसाळकर ) कळंबोलीतील राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे ३७ वे वर्ष आहे.या पुर्वी सार्वजनिक गणेशोत्सवातून समाज प्रबोधन आणि जनजागृती म्हणून  सामाजिक , ऐतिहासिक देखावे सादर जातात. या वर्षी शाळेय विद्यार्थां- विद्यार्थिनींनी भव्य रंगमंचावरून  तिची काय चुक या विषयावर आधारीत पश्चिम बंगालमध्ये डॉ महिलेवर बलात्कार करून तिची केलेली हत्या, त्याच बरोबर मुंबईसह महाराष्ट्रात वृद्धमहिला व तीन वर्षांच्या नाबालिक मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांवर आधारित जिवंत देखावा साकारला आहे, देखाव्याची मध्यवर्ती कल्पना चाळीस टक्के सामाजिक तर साठ टक्के ऐतिहासिक आहे. सार्वजनिक गणेश व सार्वजनिक गणेशोत्सवा मधून समाज प्रबोधन करून भक्ती बरोबर शक्ती देण्याचे काम हे मंडळ अविरत गेले ३७ वर्षे करीत आहे .या मंडळाचा जिवंत देखावा पाहण्यासाठी पनवेल मधून अलोट गर्दी  या स्थळी लोटत आहे.
        हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी माता - भगिनींना सन्मानाची वागणूक द्या, असे आदेश आपल्या सहकाऱ्यांना दिले होते, सध्याच्या काळात मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. रोज विनयभंगाच्या घटना घडत असून गणेशोत्सवातील या देखाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कारी रांझाच्या पाटलाचे हात पाय कलम करण्याचे दिलेले आदेश, सद्यस्थितीत हा विषय निवडला असून या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा हेतू असल्याचे राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
       लोकमान्य टिळक शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून एप्रिल २०१६ रोजी तालुका पातळीवर पहिला, जिल्हा पातळीवर दुसरा, विभागीय पातळीवर दुसरा अश्या तीन्ही पातळीवर रोख रक्कम, आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र देऊन राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आदी व इतर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
         शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेला आदर्श सध्याच्या काळातही लागू होतो, शिवचरित्रातील हा महत्त्वाचा ऐतिहासिक प्रसंग कळंबोली शहरातील राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाने आपल्या देखाव्यातून साकारला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, बोलकी चलचित्र व ओजस्वी निवेदन यामुळे गणेशभक्तांनी त्यांस अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. लेखन, दिग्दर्शन पंकज सुर्यवंशी यांनी केले आहे. पंधरा मिनिटांचा कार्यक्रम पहाण्यासाठी गणेशभक्तांकडून तुफान गर्दी होत आहे. या चलचित्र देखाव्याला भक्त व दर्शकांकडूनभरघोस प्रतिसाद मिळत आहे.
Comments