स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी सचिन कांबळे तर पनवेल महानगर क्षेत्र विधानसभा अध्यक्षपदी निलेश कांबळे यांची नियुक्ती...
पनवेल महानगर क्षेत्र विधानसभा अध्यक्षपदी निलेश कांबळे यांची नियुक्ती...


पनवेल वैभव वृत्तसेवा :- 
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी सचिन कांबळे यांची तर पनवेल महानगरक्षेत्र विधानसभा अध्यक्षपदी निलेश कांबळे यांची रायगड जिल्हाध्यक्ष उमेश साळुंखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

पनवेल शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचे संबोधन व कशाप्रकारे पुढील रणनीती असणार आहे, याचे कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.

तसेच यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त करून त्यांना नियुक्ती पत्र त्यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मयूर गायकवाड,भरत दाताड, असिफ शेख,सलमान पटेल, चंद्रकांत वेळासकर, मनोज कांबळे,समाधान कांबळे,मुमताज पठाण,विजय धोत्रे, आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments