उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार..
पनवेल वैभव / दि.3 (संजय कदम) ः उरण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन त्यांनी नवीन कोर्ट इमारती वर मजले वाढविण्याकरिता शासनाच्या एचपीसीची मान्यता दिल्या बाबत अॅड.मनोज भुजबळ यांनी आभार मानले आहेत.
तसेच जुन्या कोर्ट इमारतीसाठी देखील लवकरात लवकर मंजूरी देऊन योग्य ते सहकार्य मिळावे अशी विनंती करून त्याबाबतचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अॅड पारिजात पांडे, अॅड दीपक गायकवाड यांच्यासह पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड मनोज भुजबळ, अॅड पि.जी.खोपकर, अॅड भूषण म्हात्रे हजर होते. या बाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकपणे लवकरात लवकर काम करू, असे आश्वासन दिले आहे.
फोटो ः उपमुख्यमंत्री आभार