अरीहंत अरहम सोसायटी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा ...
पनवेल वैभव / दि.१५ : - अरीहंत अरहम मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत राणे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेशोत्सवाचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी खेळ ' पैठणीचा' आणि 'बेटी बचाव बेटी पढाव" या विषयांवर आधारित एक भव्य फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शो चे आयोजन दिग्दर्शक कावेरी मिलिंद राणे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ वर्षा प्रशांत ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, स्वाती कोळी यांची उपस्थिती होती. त्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे कौतुक केले.
तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनीही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उपस्थितांनीही गणेशोत्सवाचा आनंद लुटला. मागील वर्षांप्रमाणे यंदाही हा गणेशोत्सव अरीहंत अरहम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सिनिअर सिटिझन ग्रुप, सोसायटीचे पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.