तळोजा-खारघर भागातील कोकणी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची सभा संपन्न
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः कोकणातील अनेक व्यक्ती आपापल्या कौटुंबिक गरजांची पूर्तता करण्यासाठी खारघर-तळोजा व जवळपासच्या परिसरात स्वत:ची घरे घेऊन, तर काही भाडयाने घरे घेऊन वास्तव्य करीत असताना त्यांना संघटित करून, त्यांच्या अडीअडचणीना एकमेकांची मदत व्हावी, सुखदुःखात हातभार लागावा, मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांचा चांगला विकास व्हावा व या पिढीचा उपयोग अधिक प्रभावशाली व्हावा अशा अनेक उद्देशानें काही समविचारी लोकांनी एकत्र येत चर्चा व्हावी व त्यांच्या या विचारातून समाजाचे भले व्हावेें म्हणून अलिकडेच सभा बोलावण्यात आली होती.
या सभेला उद्योजक सुशिक्षित, अनुभवी व सामाजिक कार्यकर्ते व तरुण असे सर्व स्तरावरचे लोक एकत्र आल्याचे दिसून आले. या सभेत नौफिल सय्यद यांची सर्वानुमते कोकणी मुस्लिम वेल्फेअर अससोसिएशन तळोजा खारघर या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सभेला शमीमभाई तांबे, अमजद काद्री, नौफिल सय्यद, वसीमभाई परकार, फैसेलभाई शिवकर, तिसेकर सर, इक्बाल मुकादम, शकील जासनाईक, निजामभाई हमदूले, हमीद हमदुले, सफवान पटेल, जुबैरभाई सिद्दीकी, फैज परकार, अम्मार मदार, इरफान उके, हुसैन हमदूले, रफिक परकार, मुखतर परकार, अब्बास हमदुले, गौस खतीब, नावाफ सिद्दीकी, जुबैर हमदुले, रहमान परकार आदी उपस्थित होते.
फोटो ः वेल्फेअर असोसिएशन सभा