निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची बैठक पनवेलमध्ये संपन्न..
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची बैठक पनवेलमध्ये संपन्न
पनवेल वैभव, दि.22 (संजय कदम) ः पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास हॉल मध्ये निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची बैठक संपन्न झाली असून या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मिळून 130 सदस्य हजर होते.
यासाठी प्रमुख पाहुणे सुरेंद्र मानधने निवृत्त स.पो.आ.व तसेच संघटनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण, कार्याध्यक्ष सिद्धेश्‍वर कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्रीमती.विभा चव्हाण, सं.सल्लागार मंदार नाईक, उपाध्यक्ष देवीदास सोनावणे, उपाध्यक्ष सोपान चौधरी, उपाध्यक्ष गोपाळ दाभाडे, कार्यकारिणी सदस्य गोपीचंद पाटील, बाळकृष्ण मोटे, नंदु शिंदे, संखे, सत्रे आदी उपस्थित होते. 
यावेळी जेष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून ज्या निवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे वय 75 झाले आहे. त्यांचा सन्मान पुर्व सत्कार करण्याचे ठरले प्रमाणे पैकी 13 जेष्ठ नागरिक निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी किसन महादु महाजन, विश्‍वनाथ गणपत विचारे, दलपत कृष्णा साबळे, रमेश खंडु दगडे, कमलाकर हसु थळे, संपत लक्ष्मण नाळे, मानसिंग वामन कदम, लक्ष्मण तुकाराम साळुंखे, गजानन मोहीते, रामचंद्र बाबुराव ताटे, श्रीमती.कामटे मॅडम, चंद्रकांत थळे, पांडुरंग कमलया भातघरे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 
त्याच प्रमाणे डीवायएसपी शिवाजी फडतरे यांना नुकतेच शासनाने राष्ट्रपती पदकाने सन्मानीत केल्याने त्यांचाही शाल श्रीफळ देऊन मानधने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  प्रथम संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीमती विभा चव्हाण यांनी या संघटनेची स्थापना सन 2016 मध्ये होवुन सन 2016 ते 2021 पावेतो अध्यक्ष पदाचा कार्यभार श्रीराम गोरे यांनी अतिशय उत्कृष्ट पणे संभाळला आहे.मात्र त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने संघटनेच्या केंद्रीय सुचने नुसार आणि पदाधिकार्‍यांचे मतानुसार संघटन कौशल्य विनोद चव्हाण यांची अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आणि त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अडचणींवर मात करत  कार्यालयास जागा नसताना पनवेल मध्येच आपली स्वताची जागा संघटनेच्या कार्यालयास  देवुन सर्वांचे सहकार्याने अविरतपणे काम चालु केले आहे.प्रथम वार्षिक वर्गणीचा पायंडा बंद करून आजीवन वर्गणी सुरू केली आणि त्या मुळे आपले संघटनेचे बळ वाढीला लागले. कार्यालयाचे जागेचा प्रश्‍न सोडवण्याचे काम  संघटनेचे पदाधिकारी युद्धपातळीवर करत आहेत. तसेच शासनाने 10-20-30 या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपण अर्ज दाखल करा.त्याचा पाठपुरावा आपण करू.असेही आश्‍वासन त्यांनी दिले.        
यानंतर सदस्य मंडळींना आपल्या व्यथा मांडण्याचे सुचित करण्यात आले त्या प्रमाणे सर्व प्रथम संनदानशीव, निवृत्त अधिकारी महादेव शिंदे, सोनावणे साहेब,मंदार नाईक,शशिकांत गायकवाड,तसेच डीवायएसपी पेण श्री.फडतरे, यांनी आपली मनोगते व्यक्त करून संघटनेच्या हिताच्या मार्ग दर्शक सुचना दिल्या. शेवटी मानधने यांनी अतिशय मोलाचे आणि आयुष्याच्या पुढील वाटचाली संबंधी मार्गदर्शक सल्ले दिले.आणि संघटित झालेशिवाय कोणता ही प्रश्‍न मार्गी लागणार नाही.असे सांगून संघटना बळकटी साठी आर्थिक बळ गरजेचे आहे तर सदस्यत्व पत्करणे फारच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी आताच चर्चेतुन वरील सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सविस्तर  मार्ग दर्शन केले . आपण करत असलेले हे कार्य केवळ सामाजिक कार्याचा भाग असुन हे कार्य करण्यास मला सर्व च सदस्यांचा हातभार लागत असतो .परंतु सावली सारखी साथ मिळते  ती ते मेहनती व्यक्तीमत्व म्हणजे बबन ईलग, नंदकुमार शिंदे हे  दोघे ही सर्व नोंदणीकृत सदस्यांचे रेकॉर्ड अपडेट ठेवून महत्त्वाचे व जोखमीचे कार्य कोणत्या ही फळाची अपेक्षा न ठेवता व आपले संसारीक जिवनातील अमूल्य वेळ देवुन करत आहेत.असे आपले मत व्यक्त केले.आणि त्यांना धन्यवाद दिले.  या बैठकीला महीला सदस्य ही हजर राहिल्याने त्यांचे ही संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.


फोटो ः विनोद चव्हाण मार्गदर्शन करताना.
Comments