कर्जत विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहाबाज पटेल यांची नुकतीच कर्जत विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तसे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेशचे मेहबुब शेख यांनी दिली आहे.
पनवेल येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक काँग्रेस माध्यमातून कार्य करणारे शहाबाज पटेल यांनी आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांच्या आदेशाने व सुचनेनुसार त्यांची निरीक्षक 189-कर्जत विधानसभा-रायगड जिल्हा पदासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यापूर्वी यांनी रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कामकाज सुद्धा पाहिले आहे.
फोटो ः शहाबाज पटेल