रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा महागडा मोबाईल केला परत ...
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा
 महागडा मोबाईल केला परत ...
पनवेल/ प्रतिनिधी 
नवीन पनवेल येथे राहणारे रिक्षा व्यवसाय करणारे अशोक घनवट हे कळंबोली वरून  प्रवासी घेऊन ओरियन मॉल ला आले असता घाई गडबडीत प्रवाशाचा महागडा मोबाईल रिक्षात विसरला, त्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक अशोक घनवट यांना प्रवाशाचा मोबाईल राहिल्याचे लक्षात आले सदर प्रवाशाने मोबाईलवर कॉल केला असता रिक्षा चालक यांनी  तुमचा मोबाईल सुरक्षित आहे असे सांगितले. मनामध्ये कुठलाही किंतू-परंतू न ठेवता महागडा मोबाईल प्रवाशाला परत केला या त्यांच्या प्रामाणिकपणानचे रिक्षा चालक अशोक घनवट यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
Comments