पनवेल / वार्ताहर - :
पनवेल परिसरात अनेक आदिवासी वाडया आहेत, त्यासाठी पनवेलमध्ये आदिवासी भवन व्हावे अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे. ही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे बोलून दाखवल्यानंतर आदिवासी भवनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
पनवेल शहरात आदिवासी भवन व्हावे ही संस्था आदिवासी बांधवांची मागणी आहे. त्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. नऊ ऑगस्ट रोजी पनवेल आणि ग्रामीण भागात आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी ठाकूर समाज पनवेल तर्फे मालडुंगे ते पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅली काढून आदिवासी दिन जल्लोशात साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून बाईक रॅली काढण्यात आली. आदिवासी दिनानिमित्त समाजप्रबोधन करून ढोलावरचा नाच मंडळ वाघाची वाडी, साईनाथ नाच मंडळ धोदाणी, राधाकृष्ण महिला नाच मंडळ, जय वाघोबानाथ मंडळ धामणी यांनी नाच प्रस्तुत केले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित दर्शवली.