कँडेल मार्चच्या माध्यमातून डॉक्टरांना न्याय देण्याची केली मागणी..
नवी मुंबई / प्रतिनिधी - : कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टरही या देशव्यापी संपात सामील झाले असून त्यांनी नियमित ओपीडी आणि किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील. मेडिकवर हॉस्पिटल्सच्या वतीने कँडेल मार्च काढण्यात आले असून यामध्ये डॉक्टर, वरिष्ठ व्यवस्थापन टिम तसेच कर्मचारी सहभागी झाले होते.
डॉ. अनिल कृष्णा(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,मेडिकवर हॉस्पिटल्स) सांगतात की,डॉक्टर्स हे आपल्या आरोग्य सेवेचा मुख्य कणा आहे. मेडिकवर हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आम्ही या संपास पाठींबा दिला असून डॅाक्टरांच्या सुरक्षेसाठी आम्ही एकजुटीने उभे आहोत
मेडिकवर हॉस्पिटल्सचे कार्यकारी संचालक डॉ. शरत रेड्डी सांगतात की, कलकत्ता प्रकरणाचा निषेध करत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आम्ही देखील या संपात सहभागी झालो आहोत.
मेडिकवर हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक- ऑपरेशन्स श्री हरी कृष्ण सांगतात की, या आव्हानात्मक काळात डॅाक्टरांच्या पाठीशी उभे राहण्याचा आमचा प्रयत्न असून कॅंडल मार्चच्या माध्यमातून याचा निषेध करण्यात आला.
मेडिकवर हॉस्पिटल्स हे आपले डॅाक्टर्स व इतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेतासाठी कायम पुढाकार घेत असून यास विशेष प्राधान्य दिले जाते . भविष्यात आरोग्य सेवा प्रणाली अधिक मजबूत आणि उत्तम राहील याची खात्री करत हे रुग्णालय आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि रुग्णांसाठी सतत प्रयत्नशील राहिल.