महिलांचा विशेष सन्मान करत स्वातंत्र्यदिन साजरा
पनवेल प्रतिनिधी :- भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले, केंद्र आणि राज्यसरकार महिलांसाठी सन्मानाच्या विविध योजना व हक्क तसेच अनेक पातळीवरती महिलांना संधी निर्माण करून नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत हा विचार करुन या स्वातंत्र्यदिनी संस्कार भारती पनवेलमहानगर महामंत्री सौ. जुईली अमित चव्हाण यांना ध्वजारोहण करण्याची संधी देऊन महिला सन्मानाचा विचार प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे कार्य या शुभदिनी करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांनी बोलताना सांगितले की केंद्र आणि राज्यसरकारने महापुरुषांचा केलेला सन्मान, देशातील सर्व घटकाला मिळालेले विविध लाभ हे जनतेपर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे नाहीतर देश विघातक विचार करणारी मंडळी चुकीचा संदेश समाजात पसरवून सरकार आणि नागरिकांमध्ये वादविवाद निर्माण करतील तरी पुढील काळात सर्वांनी राष्ट्रवादाचा विचार घेऊन राष्ट्रासाठी कार्य करणारी पिढी निर्माण करण्यासाठी संकल्प करू असा संदेश देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मा. कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, संस्कार भारती पनवेल महामंत्री सौ, जुईली अमित चव्हाण यांच्यासह प्रभागातील राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.