उलवे नोडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव ..
उलवे नोडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव 
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा उलवे नोड यांच्यावतीने मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. उलवे नोड सेक्टर ९ मधील खारकोपर तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानात या उत्सवाचे सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ६ लाख ६६ हजार ६६६ रुपयांची एकूण बक्षिसे असणार असून महिलांसाठीही खास आकर्षक दहीहंडीही असणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२०२२८०८१, ९६६४६४९९५०, ९०८२९८४६९३ किंवा ८१०८५९५९८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उलवे नोड अध्यक्ष विजय घरत, महिला मोर्चा अध्यक्ष योगिता भगत यांनी केले आहे. 
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image