रेल्वे सल्लागार समिती तर्फे निवेदन..
पनवेल / प्रतिनिधी :-
खांदेश्वर स्टेशनवर पावसाळ्यात पाणी गळती होते तसेच प्लॅटफॉर्मवर पण जिकडे तिकडे पाणी गळती होते, बाकडे देखील ओले असतात जेणे करून महिला, लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना परिणामी उभे राहावे लागते. स्टेशन मधुन बाहेर जाताना पाण्यामधुन जावे लागते. तिकीट काढताना देखील प्रवाशांना भिजावे लागते अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
याचा पाठपुरावा करण्यासाठी उपेंद्र मराठे संयोजक रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ उत्तर रायगड व सल्लागार समिती सदस्य संजय जैन आणि समीर मोरे यांनी स्टेशन प्रबंधक, खांदेश्वर यांना निवेदन दिले व लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे.