शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी तर्फे महिलांसाठी विशेष भरती मोहीम...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी तर्फे महिलांसाठी भरती मोहीम...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
शिवसेना महिला आघाडी तर्फे फक्त महिलांसाठी खास भरती मोहीम शुक्रवार दि.३० मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान शिवसेना पनवेल शहर शाखा लाईन आळी येथे राबविण्यात येत आहे. सदर भरती ही रसायनी येथील नामांकित कंपनीमध्ये पॅकेजिंग या विभागासाठी आहे.

याकरिता गरजू महिलांसाठी विशेष कॅम्प महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आला आहे. यासाठीची किमान पात्रता ८ वी पास आहे. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल शहर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

यासाठी संबंधित शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन शहर शाखेतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Popular posts